Advertise here + 91 9322570331

वाघ’प्रेमीच्या रोमांचित गाथेसह…

Advertise here + 91 9322570331

आज पर्यावरण दिन. पर्यावरणातील एक घटक म्हणजे जंगल. जंगल म्हटलं की वन्यजीव डोळ्यासमोर येतात. प्रत्येकाला वन्यजीवांबद्दल जाणून घ्यायची इच्छा असते. मात्र, ते शक्य होईलच असे नाही. या वन्यजीवांत सर्वात मोठे आकर्षण म्हणजेच वाघ, परंतु, सहसा अश्या वाघांना पाहणेदेखील काहीसे कठीण असते. म्हणूनच थेट विदर्भातील अमरावती येथील सच्चे वन्यजीवप्रेमी व अभ्यासक प्रवीण प्रकाश कोळेश्वर यांनी वाघांसह इतर वन्यजीवांची दिनचर्या प्रत्यक्षात छायाचित्रां मधे कैद केलेली असून सदर छायाचित्रे पाहता जणू प्रत्यक्षात आपल्या समोरच वाघ आणि इतर प्राणी पाहतो याची अनुभूती येते. तर चला मग पाहूया 'आंबोली टाईम्स' मार्फत वाघांची अद्भुत दुनिया… आणि त्यांचा  अल्प परिचय…

जंगल म्हटलं की सर्व प्रथम समोर येतं ते वन्यजीव आणि या जीवनामध्ये प्रत्येकाची प्रत्यक्षात जीवनात एकदातरी हृद्याचा ठोका चुकवत का होईना परंतु, वाघ पाहण्याची इच्छा असते. वाघ पाहण्यासाठी आबालवृद्धांपासून अभयारण्यात जाऊन वाघ बघण्यासाठी सफारी करतात.

अश्या वाघांनी भरलेल्या जंगलात गेली १० वर्षे राज्यातील विदर्भातील अमरावती (जिल्हा) शहरातील वन्यजीवप्रेमी प्रवीण प्रकाश कोळेश्वर हे उमरेड करंडला, टिपेश्वर, पेंच, ज्ञानगंगा, मेळघाट, बोर आदी अभयारण्यांमधे रोज जात तेथिल वन्यप्राण्यांची बारकाईने पाहणी करने, माहिती घेणे व आदीसह वन्यजीवांची काळजी घेत त्यासंदर्भात संबंधित परिसरातील वनअधीक्षक, अधिकारी, कर्मचारी तथा गाईड यांच्याशी संपर्क राहून माहितीची आदानप्रदान करणे तसेच आवश्यक तेथे मदतकार्य करणे आदी अतिशय मौल्यवान कार्य त्यांच्या हातून घडते. गेली दहा वर्षे सर्व अभयरण्यांमध्ये भ्रमंती करत वन्यजीवांच्या विशेषत: वाघांची जणू परिपूर्ण ओळखच त्यांच्या जवळ आहे. यात अभ्यरण्यातील तथा जंगलातील प्रसिद्ध असलेल्या वाघांची सुमारे ३००० पेक्षा अधिक छायाचित्रे त्यांनी सध्या टिपलेली आहेत. या छायाचित्रांमध्ये तुम्ही ‘त्या’ वाघां/प्राण्यांजवळ आहात असाच भास होतो. वाघांच्या प्रत्येक भावमुद्रा त्यात टिपलेल्या आहेत. ज्यात टिपेश्वर अभयारण्यातील प्रसिध्द वाघीण आर्ची, लिटिल स्टार, (तलाववाली वाघीण); बोरमधील कतरीना, पिंकी, बाजीराव, युवराज; पेंचमधील बारसं, बिंदू, हँडसम, चार्जेर;  ज्ञानगंगामधील सी१, तसेच हे अभयारण्य अस्वलांसाठी प्रसिद्ध आहे. उमरेड कारांडलामधील  जय, जय चंद, राही, फेरी, सूर्या, सी २, पवनराज, बिट्टू, श्रीनिवास येथील वाघ हे जग प्रसिध्द आहेत. अशा अनेक वन्यजीवांची छायाचित्रे तथा माहितीचा खजानाच त्यांच्या जवळ आहे. प्रवीण कोळेश्वर म्हणतात, “जंगलाप्रती व वन्यजीवाबद्दल माझा भाव मी व्यक्त करू शकत नाही. कारण, शब्द अपुरे पडतील. एवढंच मी सांगू शकतो,” असं म्हणत ते आपले दैनंदिन आवडते कार्य करत असतात. तसेच त्यांचे सामाजिक कार्यही आजवर खुप मोठे आहे. ते नेहमी सामाजिक कार्यात सक्रिय असतात. तर आज आपण त्यांच्या माध्यमातून प्रथमच वाघांची छायाचित्रे पहिल्यांदाच आपल्या समोर आणली आहेत. तसेच उमरेड करंडला, टिपेश्वर , पेंच, ज्ञानगंगा, मेळघाट, बोर आदी अभयारण्यामध्ये आपल्यास कोरोना महामारीनंतर जायचे झाल्यास येथे वन्यप्राण्यांना आवश्य भेट द्या. आणि काही मदत लागल्यास प्रवीण कोळेश्वर यांना कधीही संपर्क करू शकता. अन त्यांच्या अनुभवातून एक अद्भुत वन्यजीवांची विशेषतः वाघांच्या दुनियेत भ्रमंती करू शकता आणि एक वेगळाच रोमांचित आनंद लुटू शकता. क्षणभर श्वास रोखून तुम्ही वाघांच्या चिरंतन आठवणी गोळा करू शकता.

– प्रवीण कोळेश्वर, वन्यजीव प्रेमी, अभ्यासक.
अमरावती ( महाराष्ट्र )
संपर्क – 8237736604

छायाचित्रे…

#अभिप्राय करिता संपर्क – 09322570331 (W)

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here