Advertise here + 91 9322570331

अजून काही दिवस अतिवृष्टी राहिल्यास पूर्ण क्षमतेने प्रवाहित होणार आंबोली मुख्य धबधबा...

मात्र, वर्षा पर्यटनावर कोरोनाची लटकती तलवार…

Advertise here + 91 9322570331

आंबोली – ता. १२ : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमि तथा मॉन्सूनच्या आगमानाने आंबोलीतील लाखो पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्र असलेला आंबोली मुख्य धबधबा आता प्रवाहित झाला असून पुढील ४ ते ५ दिवस अतिवृष्टीसारखी परिस्थिती राहिल्यास पूर्ण क्षमतेने मुख्य धबधबा प्रवाहित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, यंदा मे महिन्यात झालेल्या तौक्ते चक्रिवादळाच्या पावसातच येथे नद्या, ओहोळ, नाले आदी प्रवाहीत झाले होते. तर बारमाही वाहणाऱ्या नद्यांची तसेच इतर जलस्त्रोतांच्या पाण्याच्या पातळी देखील वाढ झाली होती. तर आता मॉन्सून आगमनावेळीच होणाऱ्या अतिवृष्टीमूळे सर्वच जलस्त्रोत पूर्ण क्षमतेने प्रवाहित होताना दिसत आहे.

दरवर्षी आंबोली वर्षा पर्यटन हे मुख्य धबधबा प्रवाहित झाल्यावर खऱ्या अर्थाने असंख्य पर्यटकांच्या गर्दीने सुरूवात होते. यंदाही जून महिण्याच्या दुसऱ्याच आठवड्यात आंबोली मुख्य धबधब्यासह घाटातील इतर धबधबे देखील प्रवाहित झालेले असून आता होत असलेली अतिवृष्टी (पाऊस) पुढील चार दिवस राहिल्यास मुख्य धबधब्यासह (ambolitimes)इतर धबधबेदेखील पूर्णक्षमतेने प्रवाहित होतील, अशी स्थिती दिसून येते.

‘आंबोली टुरिझम’ म्हणाले, येथील आंबोली मुख्य धबधबा प्रवाहीत झाल्यावर गणेश चतुर्थी ( तीन महीने ) पर्यंत वर्षा पर्यटन हंगाम चालतो. परंतु, २०१९ साली घाटमार्ग अतिवृष्टीत कोसळला होता. तसेच २०२० साली कोरोना माहामारी ज्याचा प्रादुर्भाव अद्याप आहे. या दोन वर्षी लाखो पर्यटकांना आंबोलीतील (ambolitimes)स्वर्गीय वर्षा पर्यटनाचा आनंद लूटता आला नाही. त्यामुळे यंदा कोरोना माहामारीचा प्रादुर्भाव आटोक्यात आला अन निर्बंध शिथिल झाल्यास, ज्या प्रकारे पर्यटकांची आंबोली वर्षा पर्यटन बद्दल आमच्या जवळ कल दिसतो, त्यावरून येथे हे नवीन रेकॉर्ड तोड गर्दी करत पर्यटक यंदाच्या वर्षा पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटतील अशी शक्यता येथील मुख्य पर्यटन संस्था असलेली ‘आंबोली टुरिझम‘च्या व्यवस्थापकांनी वर्तवली आहे. तसेच येथील हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र,(ambolitimes) महादेवगड पॉइंट, कावळेसाद पॉइंट, नांगरतास धबधबा येथे असंख्य पर्यटक भेट देतात. तर कुंभवडे येथील बाबा धबधबा येथेही शेकडो पर्यटक भेट देत असतात.

साल २०१९ मधे घाटमार्ग ऐन वर्षा पर्यटन हंगामात कोसळल्याने पर्यटन ठप्प झाले. त्यानंतर गेल्या वर्षी पासून कोरोना माहामारीमुळे वर्षा पर्यटनासह येथील सर्व पर्यटन हंगाम वाया गेले.(ambolitimes) त्यामुळे शेकडो पर्यटन व्यावसायिक आणि त्यांचे कुटुंब यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. तसेच यंदाही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तथा शासनाचे निर्बंध यावरही वर्षा पर्यटन हंगामाचे भवितव्य आधारीत आहे.

आंबोली वर्षा पर्यटनासाठी अधिकृत माहिती, सर्व प्रकारच्या पर्यटन सेवां ( बुकिंगस्, ॲक्टिव्हिटीज, टूर पॅकेजस् व इ. ) तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदतीकरिता “आंबोली टुरिझम” हेल्प लाईन नंबर +917030418700 ( What’s App ) वर संपर्क करू शकता. २४ तास सेवा उपलब्ध.

Advertise here + 91 9322570331

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here