Advertise here + 91 9322570331

मंत्री उदय सामंत यांची ग्वाही…!

संदेश पारकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा…!

कणकवलीत कोरोना योद्धयांचा सन्मान…!

नेते – पदाधिकारी – कार्यकर्त्यांकडून पारकरांवर शुभेच्छांचा वर्षाव…!

Advertise here + 91 9322570331

कणकवली | अनिकेत उचले – ता. १४ : शिवसेनेत आल्यानंत युवा नेते संदेश पारकर यांना पक्षात योग्य तो मान, सन्मान देण्यात येत आहे. त्यामुळे पारकर यांनी आता आहे तिथेच राहावे. भविष्यात त्यांना चांगले पद मिळवून देण्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरवठा करीन, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

युवा नेेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालयात कोरोनाचा योद्धयांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, कुडाळ-मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत-पालव, युवा सेना जिल्हाप्रमुख गितेश कडू, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, जि.प.सदस्य संजय आग्रे, स्वरुपा विखाळे, राजलक्ष्मी डिचवलकर, बाळा भिसे, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, अ‍ॅड हर्षद गावडे, संदेश पटेल-सावंत, नगरसेवक सुशांत नाईक, नगरसेविका सुमेधा अंधारी, रुपेश नार्वेकर, कन्हैया पारकर, प्रसाद अंधारी, विलास कोरगावकर, अतुल बंगे, अनंत पिळणकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.


मंत्री सामंत म्हणाले, संदेश पारकर हे आक्रमक नेते आहेत. जनतेवर अन्याय होत असेल तर ते कशाचीही तमा न बाळगता रस्त्यावर उतरतात. त्याचा आदर्श प्रत्येक शिवसैनिकांनी घेतला पाहिजे. पारकर यांच्याकडे पद असो वा नसो ते अविरतपणे सामाजिक कार्य करत राहतात. आपल्या राजकीय वाटचालीत त्यांनी अनेक चढ-उत्तार पाहिले, असंख्य आव्हानांचा सामना करत आजपर्यंत धीरोदत्तपणे उभे राहिले. आजपर्यंत त्यांनी ज्या-ज्या पक्षात गेले तेथे त्यांनी प्रामाणिकपणे काम केले म्हणून त्यांची राज्यभर आदर्श नेते म्हणून ओखळ आहे. शिवसेनेत संदेश पारकर यांना चांगले दिवस असून आता इथेच राहावे. त्यांनी हाती घेतलेले समाजसेवेचे व्रत अविरतपणे सुरू ठेवावे. तसेच पारकर यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श शिवसैनिकांनी घेऊन जिल्ह्याच पक्षाचे नेटवर्क स्टाँग करण्यासाठी स्वतःला झोकून देऊन काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

आम. वैभव नाईक म्हणाले, संदेश पारकर हे आपल्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम घेत आहेत. त्यामुळे त्यांना समाजात मानाचे स्थान आहे. जनतेच्या हृदयात आणि मनात त्यांच्याबद्दल आदराचे स्थान आहे. हीच त्यांच्या कामाची पोचपावती आहे.

अरुण दुधवडकर म्हणाले, राजकीय दहशतीच्या विरोधात लढणारे संदेश पारकर आहेत. राजकीय वाटचालीमध्ये त्यांनी काही चुकीने निर्णय घेतले. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. पण आता शिवसेनेत आल्यानंतर त्यांना पक्षात योग्य मान, सन्मान मिळत असून भविष्यात त्यांना चांगल्या पदाची जबाबदारी सोपवली जाईल, असे त्यांनी सांगितले.

सतीश सावंत म्हणाले, संदेश पारकर यांनी सामाजिक कार्याचा जोरावर जिल्ह्यात स्वतःची स्वतंत्र ओखळ निर्माण केली आहे. सर्वसामान्यांच्या सुख व दुःखात ते नेहमीच सहभागी होत असतात. त्यामुळे जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आहे. जिल्ह्याच्या व कणकवली शहराच्या विकासासाठी ते अहोरात्र झटत आहेत. राजकीय क्षेत्रात काम करताना त्यांनी जनतेशी असलेली नाळ अद्यापही तुटू दिलेले नाही.

संजय पडते म्हणाले, संदेश पारकर यांनी आपल्या राजकीय प्रवासात खूप मोठा संघर्ष केला आहे. त्यांची काम करण्याची पद्धत पहाता त्यांच्याकडे भविष्यात त्यांच्याकडे चांगले पद चालून येईल. आपल्या वाढदिनी रक्तदानासारखे सामाजिक उपक्रम राबवणे, हे आदर्शदायी आहे.

अमित सामंत म्हणाले, संदेश पारकर यांची राजकीय कार्यकिर्द राष्ट्रवादी पक्षातून सुरू झाली. संदेश पारकर यांचा संघर्षचा मी साक्षीदार असून राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांनी अनेक विकासकामे करून घेतली आहे. तसेच ज्यावेळी मी आणि माझे सहकारी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे भेटण्यास जातो, तेव्हा नेत्यांकडून संदेश पारकर कसे आहे, अशी विचारपूस केली जाते. कोरोना काळात अविरत सेवेबद्दल डॉक्टर, परिचारिका, आशासेविका, वायरमन, पोलिस कर्मचारी, सरपंच, ग्रा.पं.सदस्य, पत्रकार यांचा कोरोना योद्धा म्हणून नेतेमंडळींकडून सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here