Advertise here + 91 9322570331

तालुक्यातील सर्वच नदी – नाल्यांना पूर….!

ठीक – ठीकाणी रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प…!

पावसाच्या कहरामुळे जनजीवनही झाले ठप्प…!

कणकवली | अनिकेत उचले – ता. २२ : संततधार पडणाऱ्या पावसाने गुरुवारी मध्यरात्री वादळीवाऱ्यासह रौद्ररुप धारण केले. परिणामी कणकवली तालुक्यातील सर्वच नदी नाल्यांना पूर आल्याने आजूबाजूच्या परिसरात पाण्याचा वेढा पडला. तर काही ठीकाणी रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली. तसेच काही भागांत पडझडीच्या घटना घडल्या असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाच्या कहरामुळे जनजीवनही ठप्प झाले आहे. तर खबरदारी म्हणून पोलिस प्रशासन देखील सक्रिय दिसून आले. तसेच कणकवली तालुक्यात काही गावात पाणी आल्याने पुरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाच्यावतीने आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क असून नागरिकांनी कणकवली तहसील कार्यालय कणकवली आपत्ती व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचे आवाहन, कणकवली तहसीलदार रमेश पवार यांनी केले आहे.

दरम्यान, कणकवली – आचरा मार्गावर वरवडे फळसेवाडी येथे गुरुवारी सकाळच्या सत्रात पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. तर हरकुळ बुद्रुक भाट दुकान नजीक पुलावरून गेले पाणी, जाणवली व गडनदी वाहतेय दुधडी भरून, वागदे के टी बंधाऱ्यावरून वाहतेय पाणी, वागदे घरटन वाडी, तसेच मुंबई – गोवा महामार्गावर हॉटेल वक्रतुंड समोर ही पाणी साचल्याने वाहतूक मंदावली, उभादेव देवस्थानातही साचलेय पाणी, खारेपाटण शुक नदीने गाठली धोक्याची पातळी तसेच नाटळ कुंभवडे सीमेवरील मल्हार पुलाला बसला फटका वाहतूक बंद केली आहे.

Advertise here + 91 9322570331

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here