Advertise here + 91 9322570331

मोपा विमानतळ सुरु झाल्यास पुढे काय?; विमानतळंच श्रेय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचेच!

कणकवली | अनिकेत उचले – ता. २७ : चिपी विमानतळाचे ९ रोजी उद्घाटन होत आहे,जनतेची ईच्या पूर्ण होत आहे. शिवसेनेचे आमदार, खासदार, पालकमंत्री आहेत. मात्र, जनतेच्या मनातील काही प्रश्न अनुत्तरित आहेत, त्याचे उत्तर द्यावे.विमानतळ जोड रस्ते,पाणी,३३ केव्ही वीज लाईन कुठे आहे?पायाभूत सुविधांचे काय?उद्या पर्यटक आल्यानंतर सेवा मिळाली नाहीत,तर पर्यटक दुसरा पर्याय शोधणार आहेत.मोपा विमानतळ सुरु झाल्यास पुढे काय?विमानतळच श्रेय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचेच आहे.शिवसेनेने विमानतळाच्या उद्घाटनाचे श्रेय घ्यावे,पण पायाभूत सुविधांचे काय? याचं उत्तर पालकमंत्री व आमदार ,खासदारांनी द्यावे,असा आव्हान भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिले आहे. कणकवली येथील भाजपा जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

चिपी विमानतळ पाणी प्रश्न आहे,आजही पाणी का देऊ शकले नाहीत.खा.राऊत,माजी पालकमंत्री केसरकर, आताचे पालकमंत्री सामंत यांनी सांगावं,पाणी पुरवठा नळयोजना टेंडर तुमच्याच माणसाने घेतलं आहे.१५ किलोमीटर लाईन टाकली आणि ८ किलोमीटर आजही बाकी आहे.३३ केव्ही लाईन हवी ती ११ केव्ही कशीबशी झाली आहे,त्याला भाजपने विरोध केला का?कुडाळ पिगुळी मार्गे विमानतळ येथे जाणारा रस्त्याची अवस्था काय आहे?तुमचे हात कोणी बांधले?त्या रस्त्याला आज लही मान्यता नाही.खड्डे भरायला पैसे नाहीत.विमानतळ उद्घाटन करायला निघालेत,असा टोला शिवसेना नेत्यांना राजन तेली यांनी लगावला आहे.

पालकमंत्री केसरकर मागच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते,आता पालकमंत्री उदय सामंत आहेत.पायाभूत सुविधांसाठी मानसिकता लागते.म्हापण पासून रुंदीकरण करायचे आहे,त्यासाठी हायवे प्रमाणे पैसे द्यावेत.केसरकर यांची तिसरी टर्म आहे,खासदार यांची दुसरी टर्म आहे.रस्ता, पाणी, करण्यासाठी तुम्हाला कोणी रोखलं होत का?उद्या मोपा झाल्यावर काय होईल.विमानतळ चालवण्यासाठी पायाभूत सुविधांचे काय?१४ वर्षे झालीत लाईट,पाणी,रस्ते व्यवस्था होण्यासाठी वेळ का लागला?रुंदीकरण होताना पुन्हा अडचण आहेच.क्रेडिट घ्या,पण पायाभूत सुविधा उपलब्ध करुन द्या.माझा विरोधासाठी विरोध नाही.पर्यटनासाठी विमानतळ महत्वाचे आहे.आज पर्यटन दिनाच्या निमित्ताने इतर जिल्ह्यातील लोकांना द्यावी,अशी मागणी राजन तेली यांनी केली.

विमानतळ चालवण्यासाठी सरकारने काम केलं पाहिजे.पर्यटकांना गोवा ते सिंधुदुर्ग टुरिस्ट बोट चालवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.जेटी बांधली तर चांगलं होईल.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मदत घ्या,तर त्याला चांगलं यश येईल.पर्यटकांना दळणवळण सोयीचे झाले पाहिजे.स्पीड बोटची व्यवस्था किंवा एसी बसेच ठेवल्या पाहिजेत.वेंगुर्ले व मालवण तालुका विकास आणखी गतीने होईल.रोजगार निर्मिती करण्यासाठी पक्ष मतभेद विसरुन एकत्र येत काम केलं पाहिजे,असे आवाहनही राजन तेली यांनी केले.

Advertise here + 91 9322570331

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here