Advertise here + 91 9322570331

कोल्हापूर येथे राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन!

Advertise here + 91 9322570331

कणकवली | अनिकेत उचले – ता. १८ : महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनच्या मान्यतेने कोल्हापूर येथे २३ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत राज्यस्तरीय वरिष्ठ गट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होणार असून या संघाची निवड रविवारी करण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्हा फेन्सिंग असोसिएशनच्यावतीने रविवारी  कणकवली येथील कंझ्यूमर्स सोसायटी च्या सभागृहात जिल्हास्तरीय तलवारबाजी (फेन्सिंग) निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचे उदघाटन सिंधुदुर्ग जिल्हा फेन्सिंग अससोसिएशनचे अध्यक्ष अच्युत वणवे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

यावेळी तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे सचिव भालचंद्र कुलकर्णी, सिंधुदुर्ग फेन्सिंग असोसिएशनचे सचिव एकनाथ धनवटे, सिंधुदुर्ग अथॅलेटिक्स असोसिएशनचे सहसचिव समीर राऊत, शेवंता नाईक, जयश्री कसालकर, नितीन तावडे, साईप्रसाद दळवी, सुनील पाटील, पंच अंकुर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेत निवड झालेले खेळाडू पुढील प्रमाणे आहेत.
मुली- फॉईल- प्रथम – हुमेरा मन्सूरी, द्वितीय – वैष्णवी सरवदे, तृतीय – श्रुष्टी सावंत, साक्षी चव्हाण. सेबर – प्रथम – वैष्णवी सरवदे, द्वितीय -नायला नाईक, तृतीय – सोनिया ठाकूर, भावना ठाकूर. प्रथम- नायला नाईक, द्वितीय – हुमेरा मन्सूरी, तृतीय – भावना ठाकूर, साक्षी चव्हाण. मुले – फॉईल – प्रथम – रुद्रेश पडते, द्वितीय- रत्नेश जातेकर, तृतीय- साहील बाईत. इपी – प्रथम – कुणाल नारकर,द्वितीय – रत्नेश जातेकर,  तृतीय – वेद गणपत्ये, रुद्रेश पडते. सेबर प्रथम – साहील बाईत, द्वितीय – वेद गणपत्ये, तृतीय – कुणाल नारकर. या स्पर्धेतील विजेते खेळाडू कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

Advertise here + 91 9322570331

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here