Advertise here + 91 9322570331

कणकवली महाविद्यालयात जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न!

Advertise here + 91 9322570331

कणकवली | अनिकेत उचले – ता. २६ : ‘शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले संस्था पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक या सर्व घटकांच्या समन्वयातूनच महाविद्यालयाचा विकास होऊ शकतो म्हणून शिक्षण क्षेत्रातील सर्वामध्ये समन्वय असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कोकण विभाग पनवेल येथील उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ.संजय जगताप यांनी केले.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय उपक्रमाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संस्था पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी,पालक व विद्यार्थ्यांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा येथील कणकवली महाविद्यालयात पार पडली.

या कार्यशाळेत कोकण विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.संजय जगताप, विभागीय सहसंचालक कार्यालय, उच्च शिक्षण पनवेल येथील प्रशासन अधिकारी श्रीमती ज्ञानदा कदम, लेखाधिकारी चंद्रशेखर खामकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी युवराज साळुंखे तसेच लिपिक रवि राठोड, सचिन पवार, निखिल राठोड त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयातील संस्था पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व काही तक्रारदार उपस्थित होते.

याप्रसंगी गुगल फार्म द्वारे प्राप्त झालेल्या अडी अडचणी संदर्भात शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या वतीने स्वतंत्र बैठका घेऊन मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील प्रश्नासंबंधी उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या वतीने जिल्हास्तरावर कार्यशाळा घेण्याचा निर्णय अत्यंत स्तुत्य असून त्या माध्यमातून प्रशासन अधिक गतिमान व लोकाभिमुख होत असल्याची भावना याप्रसंगी कार्यशाळेस उपस्थित असलेल्या मान्यवरांनी व्यक्त केली. सर्वप्रथम भारतीय संविधान दिनानिमित्त संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचेही यावेळी भारतीय संविधानाची प्रत देऊन स्वागत करण्यात आले.

स्वागत समारंभाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. सोमनाथ कदम यांनी केले व कार्यशाळेचे आभार प्रदर्शन प्र प्राचार्य डॉ. आर. बी.चौगुले यांनी मानले.या कार्यशाळेसाठी कणकवली काॅलेज कार्यालयीन अधीक्षक श्री रंजन राणे व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Advertise here + 91 9322570331

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here