
पुण्यतिथी दिनी इतर कार्यक्रमांसोबतच सायं. 5 वा.पालखी मिरवणूक…!
या उत्सवाचा भाविकांनी लाभ घेण्याचे संस्थेच्यावतीने अध्यक्षांनी केले आवाहन…!

कणकवली | अनिकेत उचले – ता. २६ : परमहंस भालचंद्र महाराज यांचा 44 वा पुण्यतिथी महोत्सव सोमवार दि. 6 ते 10 डिसेंबर 2019 या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. यात 10 डिसेंबर या पुण्यतिथी दिनी इतर कार्यक्रमांसोबतच सायं. 5 वा. प.पू. भालचंद्र महाराज यांची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
यात दि. 6 ते 9 डिसेंबर या कलावधीत दररोज पहाटे 5.30 वा. समाधीपूजन, काकड आरती, स. 8.3 वा. सर्व भक्त कल्याणार्थ धार्मिक विधी, भालचंद्र
महाराज रुद्राभिषेक अनुष्ठान, दु. 12.30 आरती, तीर्थप्रसाद व खिचडीप्रसाद, दु. 1 ते 4 भजने, सायं. 4 वा. किर्तन महोत्सव रात्री 8 वा. बाबंची दैनंदिन
आरती होणार आहे.
दि. 10 डिसेंबर या प.पू. भालचंद्र महाराज यांच्या 44 व्या पुण्यतिथीदिनी पहाटे 5.30 वा. समाधीपूजन, काकड आरती, जपानुष्ठान, सकाळी 8 वा. भजने,
सकाळी 10.30 वा. समाधीस्थानी श्रींची राजोपचर महापूजा, दु. 12.30 आरती, तीर्थप्रासद व खिचडीप्रसाद, दु. 1 वा. बजने, सायं. 5 वा. संस्थान प
रिसरात परमहंस भालचंद्र महाराज यांची पालखी मिरवणूक, रात्री 8 वा. दैनंदिन आरती होणार आहे.
या महोत्सवानिमित्तच्या किर्तन महोत्सव दि. 6 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत रोज सायं. 4.30ते 7 यावेळेत दररोज होणार आहे. यात दि. 6 रोजी ह.भ.प.
महेश काणे यांचे संत गोरा कुंभार, दि. 7 रोजी ह. भ. प. चारूदत्त आफळे यांचे संत नादमेव महाराज चरित्र, दि. 8 रोजी ह. भ. प. सौ. संजोत केतकर यांचे क
ोन्होपात्रा तर दि. 9 ह. भ. प. कैलास खरे यांचे समर्थ रामदास स्वामी यांच्यावर किर्तन होणार आहे. कोरोनासंदर्भात सर्व नियम पाळून हे कार्यक्रम होणार
असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्या अध्यक्षांकडून करण्यात आले आहे.
