Advertise here + 91 9322570331

मी कामात व्यस्त असल्याने आवश्यकता भासल्यास व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे जबाब नोंदवा राणेंचे पोलिसांना पत्र…!

Advertise here + 91 9322570331

कणकवली | अनिकेत उचले – ता. २९ : जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावरील हल्ल्याच्या गुन्ह्यात भाजप आमदार नीतेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलावर असून ही अटक टाळण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनावर सुनावनी सुरू आहे. यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे कुठे आहेत या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आमदार नितेश राणे कुठे आहेत ते सांगायला मला मूर्ख समजला का? असा सवाल उपस्थित केला होता. त्याच पार्श्वभूमीवर नोटीस बजावन्यात आली असून त्यांना कणकवली पोलीस ठाण्यात हजर होण्यास सांगितले आहे.या नोटीसीची प्रत आज दुपारी त्यांच्या कणकवली मधील ओम गणेश बंगल्याच्या घराबाहेरील प्रवेशद्वारावर पोलिसांकडून लावण्यात आली होती.त्यानंतर ही नोटीस अज्ञातांनी फाडली असल्याचे कळतेय.तर याबाबत पोलिसांना खास.राणेंनी पत्राव्दारे सांगीतले की,मी दोन तीन दिवस कामत व्यस्त असून तशीच आवश्यकता भासल्यास व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे आपला जबाब नोंदवावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here