Advertise here + 91 9322570331

Advertise here + 91 9322570331

कणकवली | अनिकेत उचले – ता. ३१ : जिल्हा बँकेच्या निवडणुकीची मतदान मोजणीची प्रक्रिया आरोस येथे सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात मालवण विकास संस्था मतदार संघातील मतमोजणी सुरू झाली असून लवकरच निकाल हाती घेण्याची शक्यता आहे. मतमोजणीच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले आहे. मतमोजणीची प्रक्रिया कव्हर करण्यासाठी काही पत्रकारांना आत प्रवेश देण्यात आला आहे. अन्य पत्रकारांना बाहेर थांबविण्यात आले आहे. दोन्ही गटाचे कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्र बाहेर गर्दी केली आहे.