शिवसैनिक हल्याप्रकरणी चौकशीसाठी हजर…!

सकाळच्या सत्रात सुमारे ४० मिनिटा पेक्षा जास्त वेळ पोलिसांकडून चौकशी…!

कणकवली | अनिकेत उचले – ता. २५ : शिवसैनिक संतोष परब हल्याप्रकरणी आमदार नितेश राणे कणकवली पोलिस स्थानकात आज मंगळवार २५ जानेवारी रोजी पुन्हा चौकशीसाठी हजर झाले होते. सकाळच्या सत्रात सुमारे ४० मिनिटा पेक्षा जास्त वेळ त्यांची चौकशी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या कडून करण्यात आली.यावेळी आमदार राणे यांच्या सोबत त्यांचे वकील ऍड. संग्राम देसाई उपस्थित होते.

जिल्हा बॅंक निवडणुकीदरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले होते आणि आज सकाळी ११.३० ते १२.१० पर्यंत म्हणजे तब्बल चाळीस मिनिटे त्यांची चौकशी कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या कडून करण्यात आली.

काल सोमवारी २४ जानेवारी रोजी सकाळी आमदार नितेश राणे हे कणकवली पोलिस स्थानकात दाखल होत याप्रकरणी पोलीस तपासात सहकार्य केले होते. त्या वेळी आमदार नितेश राणे यांनी देखील पोलिसांना सहकार्य करणार असल्याचे सांगितले होते. आज पुन्हा ते कणकवली पोलिस ठाण्यात हजर झाले आणि पोलिसांच्या चौकशीला सामोरे गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here