कणकवली – अनिकेत उचले – ता. २५ : आदर्श व्यापारी संघटना, तळेरेच्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त उद्या बुधवार २६ जानेवारी २०२२ रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी ८ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, सकाळी ८.१५ वाजता श्री गांगेश्वर ढोलपथक, तळेरे घाडीवाडी यांचे ढोल वादन, सकाळी १० वाजता आरती आणि तीर्थप्रसाद, दुपारी १२ वाजता श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ तळेरे-गांवठाण चे बुवा संतोष तळेकर यांचे सुस्वर भजन, दुपारी ४.०० वाजता कै.दत्‍तात्रय तुकारामशेठ जठार यांच्या स्मरणार्थ आणि राजू जठार पुरस्कृत यशस्वी उद्योजक पुरस्कारांचे वितरण होणार आहे. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके,सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कोषाध्यक्ष अरविंद नेवाळकर, कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दिपक बेलवलकर,माजी जि. प.बांधकाम सभापती रवींद्र ऊर्फ बाळा जठार,पंचायत समिती कणकवली माजी सभापती दिलीप तळेकर, तळेरे सरपंच सौ.साक्षी सुर्वे, तळेरे उपसरपंच दिनेश मुद्रस आदी उपस्थित राहणार आहेत.

तर दुपारी ३.०० वाजता ट्वेंटी-ट्वेंटी तिरंगी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे. हा तिरंगी भजनाचा सामना शेळपी-वेंगुर्ले येथील डुंगो कमला प्रासादिक भजन मंडळाचे बुवा दिनेश वागदेकर, वर्दे-कुडाळ येथील श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळाचे बुवा विजय उर्फ गुंडू सावंत आणि नाडण-देवगड येथील श्री माहादेश्वर प्रसादिक भजन मंडळाचे बुवा संदिप पुजारी यांच्यात होणार आहे.

सदर कार्यक्रम तळेरे बाजारपेठ येथे होणार असून कोरोनाच्या शासकीय नियमांचे पालन करून पार पाडला जाणार आहे.तरी या कार्यक्रमाला सर्व रसिकांनी कोरना नियमांचे पालन करत उपस्थित रहावे असे आवाहन आदर्श व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ राजू जठार आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here