नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे प्रतिपादन…!

केएनके स्मॅशरतर्फे कणकवली न.पं. च्या बहुउद्देशीय हॉल मध्ये बॅडमिंटन स्पर्धेचा शुभारंभ…!

कणकवली | अनिकेत उचले – ता. २५ : शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी प्रत्येकाने बॅटमिंटन खेळ खेळला पाहिजे.तसेच बॅटमिंटन खेळातही करिअर करण्याची संधी खेळाडूंना नक्कीच आहे.पुढील वर्षी या स्पर्धा कणकवली न.प.कडून उभारण्यात आलेल्या स्पोर्ट कॉम्प्लेक्स मध्ये खेळवण्यात येतील तसेच केएनके स्मॅशरतर्फे भरविलेल्या जिल्हास्तरीय बॅटमिंटन स्पर्धेतून राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय खेळाडू घडतील , असे प्रतिपादन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले.

केएनके स्मॅशरतर्फे कणकवली नगरपंचायतीच्या बहुउद्देशीय हॉल येथे जिल्हास्तरीय बॅटमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या उपस्थितीत उपनगराध्य बंडू हर्णे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बंडू गांगण,सिद्धेश तळगांवकर,जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळे , प्रतिष्ठीत व्यापारी आनंद पोरे , ठेकेदार संदीप ठाकूर,आदी मान्यवर तसेच खेळाडू व रसिक प्रेक्षक उपस्थित होते.

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केएनके स्मॅशरतर्फे नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
ही स्पर्धा १७ वर्षांखालील पुरुष ( सिंगल ) , खुला गट ( एकेरी व दुहेरी ) , ४० वर्षांवरील ( दुहेरी ) अशा तीन गटांत होणार असून उदघाटनंतर १७ वर्षांखालील पुरुष ( सिंगल ) , ४० वर्षांवरील ( दुहेरी ) स्पर्धेला प्रारंभ झाला. खुला गट ( एकेरी व दुहेरी ) स्पर्धा बुधवारी होणार आहे . तर या स्पर्धेत जिल्ह्यातील ८० खेळाडू सहभागी झाले आहेत.यामध्ये बाल क्रीडा रसिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सामान्या दरम्यान स्पर्धेतील खेळाडूंनी खेळाचे सुंदर प्रदर्शन करत या स्पर्धेत खऱ्या अर्थाने रंगत आणली. या स्पर्धेत पंच म्हणून अभिजीत दाभोळकर तर गुणलेखक मनीष कर्पे काम म्हणून पाहत आहेत.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सोम गांगण ,मनीष कर्पे,शुभम मालंडकर ,सर्वेश राणे,अथर्व पोरे,ओमकार कडू ,निखिल घवाळी,विनायक नाईक हे मेहनत घेत आहेत.ही स्पर्धा पाहण्यासाठी न.पं. च्या बहुउद्देशीय हॉल मध्ये कोविड विषयक नियमांचे पालन करून ही स्पर्धा खेळवण्यात येत आहे.बुधवारी अंतिम विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम,चषक व सन्मापत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते
गौरविण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here