Advertise here + 91 9322570331

वार्ड क्र. ७ बाजरेपठ संघ ठरला उपविजेता…!

क्रिकेट स्पर्धेला क्रीडा रसिकांनी लुटला आनंद…!

Advertise here + 91 9322570331

कणकवली | अनिकेत उचले : कणकवली शहर भाजप आयोजित कमळ चषक स्पर्धेतील अंतिम सामना वार्ड व क्रमांक १६ परबवाडी विरुद्ध वार्ड क्रमांक ७ बाजरेपठ यांच्यात झाला यात वार्ड क्रमांक १६ संघाने वार्ड क्रमांक ७ संघाचा पराभव करत कमळ चषकावर आपले नाव कोरले . या स्पर्धेत प्रथम विजेत्या ठरलेल्या संघाला १५ हजार रोख रुपये चषक व बकरा तर उपविजेत्या संघाला १० हजार रुपये , चषक व कोंबडी अशा स्वरूपातील बक्षीसे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

विद्यामंदिराच्या पंटागणावर दोन दिवस रंगलेल्या कमळ चषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात वार्ड क्रमांक १६ संघाने नानेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत क्रमांक ७ संघाला फलंदाजीचे आमंत्रण दिले वार्ड क्र ७ संघाने ४५ धावा काढून वार्ड क्रमांक १६ संघाला ४७ धावांचेआव्हान दिले . या आव्हानाचा पाठलाग करताना वार्ड क्रमांक १६ संघाने ५ ओव्हरमध्ये पूर्ण करत स्पर्धेचे जेतेपद पटकाविले तर वार्ड क्रमांक ७ संघाला उपविजेत्यावर समाधान मानावे लागले या स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिक उत्कृष्ट फलंदाज – किरण परब ( वार्ड क्रमांक १६ संघ ) , उत्कृष्ट गोलंदाज – प्रसाद चव्हाण ( बार्ड क्रमांक ७ संघ ) , अष्टपैलू खेळाडू – राकेश चव्हाण ( वार्ड क्रमांक १६ संघ ) ठरला त्यानंतर स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला . यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे , उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बडू हर्णे , नगरसेवक संजय कामतेकर कन्झ्युमर सोसायटीचे चेअरमन संदीप नलावडे ,अनंत पारकर, शहराध्यक्ष अण्णा कोदे उद्योजक राजू गणावकर सुशील पारकर राज नलावडे , सागर राणे , नऊ झेमणे , राजा पाटकर आदी मान्यवर उपस्थित होते . मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघाला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले या स्पर्धेत समालोचन बाळू वालावलकर यांनी केले या स्पर्धेत शहरातील १७ वार्डातील संघ सहभागी झाले होते.या स्पर्धेचा क्रीडा रसिकांनी आनंद घेतला.स्पर्धा यशस्वीते साठी शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here