कणकवली | अनिकेत उचले : रोटरी क्लब सिंधुदुगतर्फे कसाल बसस्थानकाच्या रंगरंगोटी व बॅनरचे काम करून देण्यात आले आहे. रोटरी क्लबच्या सामाजिकदायित्वबद्दल रोटरी क्लबचे ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलचे अध्यक्ष डॉ. प्रशांत कोलते यांचा शाल,श्रीफळ देऊन कसाल बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक महेश तावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रोटरी क्लबचे शशिकांत चव्हाण, नवीन बांदेकर, गजानन कांदळगावकर, सचिन मदने, प्रसाद मोरजकर, उदयकुमार जांभवडेकर, प्रभाकर सावंत, अतुल बामणे, सत्यवान चव्हाण, डॉ. वैभव आईर, डॉ. सिद्धार्थ परब, प्रवीण मोरजकर, आनंद मसुरकर, समीर परब, भालचंद्र सावंत, उत्तम कदम, गिरणी कामगार सेनेचे पांडुरंग गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. रोटरी क्लबच्या या उपक्रमाबद्दल सर्वांनी कौतूक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here