बिजलीनगर मधील नागरिकांमधून समाधान व्यक्त…!

कणकवली | अनिकेत उचले – ता. १२ : कणकवली शहरात बिजलीनगर येथे गेले दोन दिवस भासत असलेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी तात्काळ याची दखल घेत बिजलीनगर वासियांना अग्निशमन बंब च्या टाक्या द्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. कणकवली उबाळे मेडिकल कडील नाल्याचे काम करत असताना या ठिकाणची नळ योजनेची पाईपलाईन फुटल्याने ही समस्या निर्माण झाली होती. त्याची तातडीने दखल घेत नगराध्यक्ष श्री. नलावडे यांनी बिजलीनगर वासियांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली. याबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here