
काशीविश्वेश्वर मंदिरातील हरिनाम सप्ताहाची नगर प्रदक्षनेणे सांगता…!
मंदिरात गेले सात दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले…!

कणकवली | अनिकेत उचले – ता. ११ : काशीविश्वेश्वर मंदिरात सुरु असलेल्या हरिनाम सप्ताहाच्या सातव्या दिवशी महापुरुष मित्रमंडळाने देव भावाचा भुकेला या पौराणिक कथेवर आधारित ‘स्वामी चमत्कार’ हा चित्ररथ देखावा सादर केला. हा देवाखा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. काशीविश्वेश्वर मंदिरात ४ ऑगस्टपासून हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला. या सप्ताहाच्या शेवटच्या सातव्या दिवशी महापुरुष मित्रमंडळाने केलेला चित्ररथ लक्षवेधी ठरला. यामध्ये आकाशातून पडणारे पाणी ज्या प्रकारे समुद्राला जाऊन मिळते. त्याचप्रमाणे देवतेला केलेला नमस्कार हा श्रीहरीला पोहोचतो. या कथेतही बाळाप्पाने स्वामींना दही दिले आणि त्यांना कृष्ण अवतारातील आपल्या बालरूपाचे स्मरण झाले. त्यांनी आपल्या अनेक आठवणी बाळाप्पा समोर प्रकट केल्या आणि त्या लीला ऐकून बाळाप्पाला कृष्णाच्या बाल रूपाचं दर्शन घेण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. ‘देव भावाचा भुकेला’ या भावनेने देव भक्ताच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सदैव तत्पर असतो. स्वामींनी बाळकृष्णाचे नवनीत खाणारे रूप दाखवून आपल्या भक्ताला धन्य केले.
या सप्ताहात पहिल्या दिवशी आंबेआली मंडळाने साईबाबांवर आधारित चित्ररथ देखावा सादर केला. दुसऱ्या दिवशी ढालकाठी मित्रमंडळाने साईदर्शन चित्ररथ देखावा सादर केला. तिसऱ्या दिवशी बाळ गोपाळ हनुमान मंडळ कांबळे गल्ली यांनी संत जनाबाई हा पौराणिक कथेवर आधारित चित्ररथ देखावासादर सादर केला. पाचव्या दिवशी पटकिदेवी मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर चित्ररथ देखावा सादर केला. तेलीआळी मित्रमंडळाने पांडुरंग अवतार हा चित्ररथ देखावा सादर केला. काशिविश्वरेवर मंदिरात सुरू असलेल्या अंखड हरिनाम सप्ताह निमित्त विविध धार्मिक,सांस्कृतिक, कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. शहरातील विविध मंडळानी चित्ररथ –दिंडीत सहभाग घेत ऐतिहासिक पौराणिक कथेवर आधारित चित्ररथ देखावे सादर केले. हे चित्ररथदेखावे पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी बाजरपेठ व पटवर्धन चौकात मोठी गर्दी केली होती. गुरुवारी कणकवली शहरात नगरप्रदक्षणा व दुपारी महाप्रसादाने हरिनाम सप्ताहाची सांगता झाली.