
श्री श्री वामनाश्रम स्वामी यांचे वैश्य समाजबांधवांनी केले स्वागत…!

कणकवली – अनिकेत उचले : काशी येथील मूळ वैश्य कुलगुरु मठाच्या पुनर्निर्माणासाठी वैश्य कुलगुरु हळदीपूर श्री शांताराम मठाधिपती परमपूज्य श्री श्री वामनाश्रम स्वामी यांच्या शांकर एकात्मता पदयात्रेचे गुरुवारी सायंकाळी कणकवली आगमन झाले. यात्रेचे वैश्यसमाजबांधवांनी स्वागत केले. काशी येथील मूळ वैश्य कुलगुरु मठाच्या पुनर्निर्माणासाठी वैश्य कुलगुरु हळदीपूर श्री शांताराम मठाधिपती परमपूज्य श्री श्री वामनाश्रम स्वामी यांच्या शांकर एकात्मता पदयात्रेला विजयादशमी पासून कालडी (केरळ) येथून आरंभ झाला आहे. ही यात्रा कसालमार्गे वागदे, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आप्पासाहेब पटवर्धन चौक, बाजारपेठ मार्गे प. पू. भालचंद्र महाराज संस्थानात दाखल झाली. यावेळी परमहंस भालचंद्र महाराज यांचे वामनाश्रम स्वामी यांनी दर्शन घेतले. त्यानंतर ही यात्रा बांधकरवाडी येथील अॅड. दीपक अंधारी यांच्या निवासस्थानी दाखल झाली. या ठिकाणी शनिवारपर्यंत मुक्काम असणार आहे. ही यात्रा कणकवली तालुका वैश्य समाज संघटनेचे अध्यक्ष सीताराम उर्फ दादा कुडतरकर, नगराध्यक्ष समीर नलावडे, उमेश वाळके, नागेश मोरये, विलास कोरगावकर, दादा केणी, रुपेश खाडये, नगरसेविका मेघा गांगण, सुमेधा अंधारी, सोहम वाळके, चेतन अंधारी, सुलभा वाळके, अजय गांगण, प्रसाद अंधारी, नारायण अंधारी, लवू पिळणकर, लवू म्हाडेश्वर, सुप्रिया तायशेटे, प्राची कर्पे, मानसी कर्पे, माधवी मुरकर, स्वरुप कोरगावकर, तन्मय नार्वेकर, मिलिंद कोदे, सौ. कानेकर यांच्यासह वैश्य बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात्रेदरम्यान वामनाश्रम स्वामी यांचा नामाचा जयघोष वैश्य बांधवांनी केला.