Advertise here + 91 9322570331
Advertise here + 91 9322570331

कणकवली – अनिकेत उचले : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कणकवली शहरात शुक्रवारी दुपारी १ वाजता च्या सुमारास आगमन झाले. यावेळी कणकवली पटवर्धन चौक येथे त्यांचे ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. या स्वागतावेळी कणकवलीतील सिंधुगर्जना ढोल पथकाच्या माध्यमातुन वातावरण निर्मित करण्यात आली. यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई, बाळा नादगांवकर,अमित ठाकरे,प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर आदी उपस्थित होते. यानंतर राज ठाकरे हे कणकवली येथे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच नागरिक व पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दया मेस्त्री,तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर, उपतालुकाध्यक्ष अनंत आचरेकर,संतोष कुडाळकर,निखिल आचरेकर,शांताराम सादये ,प्रसाद हळदीवे,सुनिल सोनार ,समीर तेली ,ओंकार देसाई,अरविंद घाडीगावकर,संग्राम मेस्त्री,अमित घाडी, अंनत घाडी,संदीप वारिक,मनविसे रत्नागिरी सिंधुदुर्ग अध्यक्ष अमोल साळुंखे,सर्वेश सावंत, मनविसे जिल्हाध्यक्ष निलेश मेस्त्री समीर पाटणकर,जगदीश सावंत, सिध्दी नारकर, ज्ञानेश्वर मोरे,विश्राम लोके आदींसह पदाधिकारी व मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here