Advertise here + 91 9322570331

मनसे नेते बाळा नांदगावर यांनी दिल्या कानपिचक्या…!

Advertise here + 91 9322570331

कणकवली – अनिकेत उचले : सिंधुदुर्गातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा सिंधुदुर्ग दौरा पूर्वनियोजित असताना देखील मनसैनिक आले नाहीत. याला पदाधिकाऱ्यांची अनास्था कारणीभूत असून ही गंभीर बाब आहे. पदाधिकाऱ्यांबाबत येत्या दोन दिवसांत राज ठाकरे निर्णय घेतील, अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आम्ही केलेल्या विनंतीमुळे राज ठाकरे या बैठकीला आले नाहीत, पुढील दौरा रत्नागिरीच्या दिशेने राज ठाकरे यांचा होईल, असे ही त्यांनी सांगितले. राज ठाकरे हे कणकवलीत येणार असतानाही पक्षाच्या बैठकीला सभागृह मिळत नाही, काय ही परिस्थिती आहे. राज ठाकरे यांनी केवळ फोटो मारण्यासाठी यावं का? असा सवालही नांदगावकर यांनी केला. पक्षवाढीसाठी मनसैनिकांनी काम केलं पाहिजे. पदाधिकाऱ्यांनी पदांना न्याय देऊ शकत नसतील तर त्या पदावर राहण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? याचा गांभीर्याने विचार करावा, अशा कानपिचक्या नांदगावकर यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. कणकवली विधानसभा मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची अवघ्या ५ मिनिटांची बैठक झाली. या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, माजी आ.परशुराम उपरकर, जिल्हाध्यक्ष धीरज परब, दया मेस्त्री, तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर मनसे नेते राज ठाकरे आपल्या तफ्यासह आता रत्नागिरीकडे मार्गस्थ झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here