Advertise here + 91 9322570331

ग्रा.पं.निवडणुकीत भाजपने खोलले खाते…!

Advertise here + 91 9322570331

कणकवली – अनिकेत उचले : तालुक्यातील शिडवणे, वायंगणी व ओझरम या तीन ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. या ग्रामपंचायतींवर भाजप पुरस्कृत पॅनेलंचे सरपंच व सदस्य बिनविरोध आले आहेत. शिडवणे ग्रामपंचायत सरपंचपदी रवींद्र राजाराम शेट्ये व वायंगणी ग्रा.पं.च्या सरपंचपदी अस्मि प्रशांत लाड व ओझरम सरपंचपदी समृध्दी राणे यांचे एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे अशी माहिती या विभागाचे माजी जि. प. सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार यांनी दिली.

कणकवली तालुक्यातील अनेक गावांमध्ये ग्रा.प.ची निवडणूक अटीतटीची होत असताना तळेरे व खारेपाटण विभागातील दोन ग्रा. पं. च्या सरपंच व सदस्यांची बिनविरोध निवड होत आहे. त्यामध्ये शिडवणे ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र शेटये हे बिनविरोध आले आहेत, या ग्रा.पं.च्या सात जागांपैकी प्रभाग एक मधील दोन जागांसाठी दीपक जीवबा पाटणकर व कोमल कृष्णा शेटये, प्रभाग दोन मधील तीन जागांसाठी शांताराम यशवंत धुमाळ, दयानंद दिनकर कुडतरकर व सुप्रिया सुनील पांचाळ यांचे प्रत्येकी एक अर्ज आल्याने या पाच जागा बिनविरोध आल्या आहेत. तर प्रभाग तीन मधील दोन जागांसाठी स्मिता मनोहर टक्के, सुप्रिया योगेश पाष्टे व राजश्री गोकुळ शिर्सेकर असे तीन अर्ज आले आहे. यातील एका उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यास या दोन्ही जागाही बिनविरोध होणार आहेत. शिडवणे गावातील ग्रामस्थांनी एकत्र बैठकीत मागील सदस्य संख्या विचारात घेत भाजपला पाच व शिवसेना पुरस्कृत उमेदवारांना दोन जागा देण्याचे ठरविले. त्यानुसार ग्रामस्थांनी एकमत करत सरपंच व सदस्य पदासाठी उमेदवार निश्चित केले. प्रभाग तीन वगळता सरपंच व सदस्य पदाच्या सहा जागा बिनविरोध आल्या आहेत.

वायंगणी ग्रा.पं.चे सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी राखीव आहे,या पदासाठी अस्मि प्रशांत लाड यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली तर सदस्य पदासाठी प्रभाग एक मधून तीन जागांसाठी वनिता विलास सुतार, भारती भालचंद्र परब व उज्वला विलास लाड, प्रभाग दोन मधील दोन जागांपैकी एका जागेसाठी संभाजी रामचंद्र बाणे यांनी अर्ज दाखल केला तर दुसर्‍या जागेसाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. प्रभाग तीन मधील दोन जागांसाठी प्रताप रामचंद्र फाटक व भाग्यश्री भिकाजी बाणे यांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला. ग्रा.पं.च्या सहा जागांसाठी सहा अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here