Advertise here + 91 9322570331
Advertise here + 91 9322570331

कणकवली – अनिकेत उचले : कणकवली बाजारपेठ येथील रहिवासी शरद शांताराम पारकर (वय 75) यांचे मंगळवार 6 डिसेंबरला दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. शरद पारकर यांनी काही काळ एसटी महामंडळातही काम केले. त्यांचे इंग्लिश विषयाचे ज्ञान चांगले होते. त्यामुळे ते कणकवलीत मुलांचे क्लासही घ्यायचे. शहरातील महापुरुष मंडळाच्या तसेच इतर धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमातही त्यांचा हिरहिरीने सहभाग असायचा. शहरातील अंत्यविधी कार्यातही त्यांचा मदतीचा सहभाग असायचा. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, दोन मुली, एक जावई, चुलते असा परिवार आहे. शहरातील दिलीप पारकर यांचे ते बंधू होत. त्यांच्यावर कणकवलीतील स्मशानभूमी आज रात्री अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here