Advertise here + 91 9322570331

सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडला अपघात…!

Advertise here + 91 9322570331

कणकवली – अनिकेत उचले : कणकवली आचरा मार्गावरील पिसेकामते कदमवाडी येथे मोटरसायकल व कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलस्वर कृष्णा अच्युत मसुरकर (वय ५८, राह.मसुरे कावावाडी ता.मालवण) हे जागीच ठार झाले आहेत. त्यांच्या समवेत असलेली त्यांची मेहुणी वैभवी विजय तोडणकर( राह- मुंबई) ही गंभीर जखमी झाली आहे.हा अपघात सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडला. मसुरकर हे कणकवली येथून मसूरे कावावाडी येथील आपल्या गावी जात असताना अपघात घडला!

अधिक वृत्त असे की, कणकवली आचरा मार्गावर पिसेकामते कदमवाडी येथील वळणावर कारचालक प्रमोद बाबाजी मयेकर (रा. बांदीवडे सध्या.कणकवली) हे आपल्या ताब्यातील कार घेऊन कणकवलीच्या दिशेने येत होते .यावेळी कृष्णा मसूरकर हे आपल्या मोटरसायकलने कणकवली येथून मसूरे येथे जात होते. यावेळी समोरासमोर धडक बसून हा अपघात झाला. या अपघातात मोटरसायकल चालक कृष्णा मसुरकर हे जागीच ठार झाले.जखमी वैभवी विजय तोडणकर यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले .घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याहून पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले . कृष्णा मसुरकर आणि त्यांची मेहुणी वैभवी हे रेल्वे आरक्षित तिकीट घेण्यासाठी कणकवली आले होते.वैभवी विजय तोडणकर या आपल्या वडिलांना घेऊन उद्या मुंबईला जाणार होत्या.त्यामुळे तिकीट घेऊन ते मसूरे येथे परतत असताना हा भीषण अपघात झाला.याबाबत अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here