Advertise here + 91 9322570331
चौकुळ : रानफुलांचा बहर
Advertise here + 91 9322570331

चौकुळ – विनोद गावडे, ता. ३ : आंबोली, चौकुळ व गेळे परिसरात सर्वत्र रानफुलांना बहर आलेला आहे. सध्याच्या घडीला चौकुळ येथील सडे व पठाकारडे पाहतानाही निसर्गाची मुक्त हस्ते उधळणाची प्रतिची येत आहे. येथे असंख्य पर्यटक आणि निसर्गप्रेमींसाठी पर्वणी असणाऱ्या चौकुळ पठारावर दरवर्षीप्रमाणे यंदाही शेकडो प्रजातीच्या दुर्मिळ आणि तितक्याच लक्षवेधी फुलांचा बहर आला आहे. 

दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटापासून सप्टेंबर महिण्यात येथील सडे व पठारे शेकडो प्रजातीची रानफुलांचे नजर जाईल तिथपर्यंत विविध रंगाच्या रानफुलांनी सजलेले नजरेस पडतात. याठिकाणी निसर्ग पर्यटनासाठी विविध भागातून येणाऱ्या पर्यटकांनाही ही मनमोहक रानफुले आकर्षित करतात, तर यंदा चौकुळ सडे व पठारे बहरले खरे, पण निसर्गाची ही लीला पाहण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना मात्र या ठिकाणाला भेट देता येण्याची शक्यता फारच कमी आहे.

आंबोलीसह गेळे व चौकुळ या गावांमधील वातावरण जवळजवळ सारखेच असते. धुके, पाऊस, दऱ्या, निमसदाहरित जंगल, नद्या, ओढे, शेती, राहणीमान सगळं काही सारखंच असून जैवविविधतेच्या दृष्टीने संपूर्ण पश्चिम घाटात या आंबोली परिसरातील गावांना अनन्य साधारण महत्त्व आहे. येथे शेकडो प्रजातीची असंख्य गुलाबी, निळ्या, सफेद, लाल, तपकिरी अशा विविध रंगांमध्ये फुलणारी रानफुले आढळून येतात. तसेच येथील वातावरण या रानफुलांच्या बहरासाठी अतिशय पोषक असल्याने सर्वत्र ही रानफुले येथील परिसरात सहज आढळून येतात. यातील काही रानफुले स्थानिक भाषेत तेरडा, बुगडी, सांगाडी, तपकी या आणि अशा अनेक गंमतीदार नावांनी ही फुले ओळखली जातात. या फुलांसोबत या फुलांवर भिरभिरणारे किटक व फुलपाखरे देखील सर्वांचे मन मोहून टाकतात; तर फुले ही सगळ्यांच्या आवडीची असल्याने फुलांची छायाचित्रे काढण्याचा मोह कोणाला आवरणार नाही असेच जणू काही! तर सोशल मीडियावर फोटोग्राफ अपलोड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात युवा वर्ग इथे येतो…

Advertise here + 91 9322570331

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here