

कणकवलीत मुडेश्वर मैदानांजिक प्रकार
सबधितांवर कारवाई होणार का?

कणकवली – ता. ७ : कणकवली शहरालगत हरकूळ बुद्रुक येथे चार दिवसापूर्वी वापरलेली पीपीई किट उघड्यावर टाकल्याची घटनासमोर आली असतानाच पुन्हा मुडेश्वर मैदानाकडे वापरलेली पीपीई किट,हँडग्लोज रस्त्यालगत टाकल्याचा धक्कादायक प्रकारसमोर आला आहे.
हरकूळ बुद्रुक येथे कोविड केअर सेंटर असून या सेंटर पासून अवघ्या काही अंतरावर हे पीपीई किट व हँडग्लोज सापडले आहेत. अशा प्रकारे बेजबाबदार पणे पीपीई किट व हँडग्लोज टाकल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन व जनता कसोशीने प्रयत्न करत असताना कोरोनाच्या प्रसाराला निमंत्रण देणाऱ्या या प्रकारा बाबत शोध घेत सबधितांवर कारवाई करण्यात येणार काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. चार दिवसापूर्वी नरडवे रोडवर हरकूळ बुद्रुक येथे आढळलेल्या पीपीई किट च्या घटने बाबत प्रशासनाने गांभीर्याने घेतले नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे हा प्रकार पुन्हा घडल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दिवस – रात्र प्रयत्न करणाऱ्या आरोग्य विभाग व महसूल प्रशासनाकडून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात येणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ही पीपीई किट वारंवार त्या रस्त्यावर टाकण्याचे नेमके कारण काय? या मागे त्या सबधितांचा उद्देश काय? हे जाणूनबुजून केले जाते की अनावधानाने घडतेय असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
