Advertise here + 91 9322570331

 

कणकवली | अनिकेत उचले – ता. २३ : मॉर्निंग बँडमिटन क्लब, कणकवलीच्यावतीने येथील नगरपंचायत बहुउद्देशीय हॉल येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत खुल्या एकेरी गटात ओंकार कडू, १५ वर्षांखालील एकेरी गटात यश कामत तर खुल्या दुहेरी गटात अर्थव पोरे व निखिल घवाळी यांनी प्रथम पारितोषिक पटकाविले. स्पर्धेला खेळाडू व क्रीडारसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेत १५ वर्षाखालील गटात द्वितीय मयुरेश कुबल, खुल्या एकेरी गटात द्वितीय अर्थव पोरे तर खुल्या दुहेरी गटात द्वितीय मनिष कर्पे व ओंकार कडू यांनी पारितोषिके पटकावली. स्पर्धेतील उगवता खेळाडू म्हणून जयेश कारले यांची निवड करून त्याला खास रॅकेट देऊन गौरविण्यात आले.

दोन दिवस झालेल्या या स्पर्धेत तालुक्यातील ६० खेळाडू सहभागी झाले होते. रविवारी अटीतटीच्या लढती पहायला मिळाल्या. पारितोषिक वितरण सोहळा ज्येष्ठ बॅडमिंटनपटू शशिकांत गणपत्ये, चेतन मुंज, संतोष कांबळी, डॉ . पेंडूरकर, शेखर गणपत्ये , श्री . कामत, संदीप ठाकूर, आनंद पोरे यांच्या उपस्थितीत पार पडला.

विजेत्या, उपविजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वीतेसाठी विनायक नाईक, विशाल हळदिवे, सर्वेश राणे, बाळाजी देसाई, सोहम गांगण, मुकुंद तळेकर, आशुतोष मसुरकर, मनिष सावंत यांनी मेहनत घेतली. स्पर्धेच्या दरम्यान शहरातील विविध मान्यवरांनी भेटी देऊन स्पर्धा आयोजन व खेळाडूंचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रमेश जोगळे यांनी केले.

Advertise here + 91 9322570331

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here