
रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी यादृष्टीने केल्या प्रशासनाला सूचना…!
कोविड सेंटर २५ बेड्चे असून गरज भासल्यास बेड वाढवणार…!
नगराध्यक्ष, न.पं.प्रशासनाचे केले कौतुक…!
कणकवली | अनिकेत उचले – ता. १९ : कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेवून कणकवली न.पं.च्या माध्यमातून मुडेडोंगरी येथील पर्यटन केंद्रात कोविडा सेंटर सुरु करण्यात येणार आहे. या केंद्राची आज कणकवली मतदार संघाचे आम.नितेश राणे यांनी पाहणी केली. कोविड सेंटर कार्यन्वित झाल्या नंतर या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी.यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना नगराध्यक्ष समीर नलावडे व न.पं.प्रशासनाला दिल्या.
रुग्णाना देण्यात येणारा आहार हा सखस असावा. जेणेकरून कोणत्याही रुग्णांची आहार विषयक तक्रार येणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन हि त्यांनी संबंधिताना केले.
कणकवली न.पं.प्रशासनाने कोविड सेंटर उभे करून राज्यात एक वेगळा आदर्श निर्माण केल्याचे सांगून नगराध्यक्ष व न.पं.चे कौतुक केले. तसेच सध्या स्थितीत हे कोविड सेंटर २५ बेड्चे असून गरज भासल्यास या परिसरतात मंडप उभारून बेड वाढवण्याचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हे कोविड सेंटर सुरु करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्याची परवानगी तसेच रायोग्य विषयक सोइ सुविधा कमी पडणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, नगरसेवक संजय कामतेकर, अभिजित मुसळे, विराज भोसले, शिशिर परूळेकर, अण्णा कोदे, किशोर धुमाळे, बंडू गांगण, संदीप मेस्त्री तसेच न.पं.चे कर्मचारी उपस्थित होते.