कणकवली नगरपंचायतीच्या सी.सी.सी.चे आम. नितेश यांनी केले कौतुक…!

कणकवली | अनिकेत उचले – ता. २० : जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कणकवली नगरपंचायत करीत असलेले काम हे जनहिताचे आहे. कणकवली नगरपंचायतीने उभारलेले हे कोविड केअर सेंटर सर्व सुविधांनी सज्ज असून नगराध्यक्ष समीर नलावडे आणि सहकारी यांनी कोरोना रुग्णासाठी उपलब्ध केलेल्या सुविधा या आदर्शवत आहेत. असे उद्गार आमदार नितेश राणे यांनी काढले. तर ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करणारी शिवसेना जिल्ह्यात मात्र, १०० टक्के राजकारण करत असल्याची टीका आम. नितेश राणे यांनी केली.

कणकवली नगरपंचायतच्या कोविड केअर सेंटरला आमदार नितेश राणे यांनी भेट देत या कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध असलेल्या सोयीसुविधाची माहिती घेतली. खूप उत्तम प्रकारच्या सोयीसुविधा नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांच्या टीमने या कोविड केअर सेंटरला उपलब्ध करून दिले आहेत. त्याबद्दल त्यांचे कौतुक केले, तसेच जिल्ह्यामधील इतरानी या कोविड सेंटरचे अनुकरण करावे. असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अभिजित मुसळे, विराज भोसले,मेघा गांगण, बाबू गायकवाड डॉ.रुपाली वळंजू यांच्यासह कोरोना केअर सेंटर मधील डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.

कणकवली नगरपंचायतीने हे उभारलेले हे कोविड केअर सेंटर कणकवलीकरांसाठी उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे आम. नितेश राणे यांनी कौतुक केले आहे. तसेच हे कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी शिवसेनेने जो वेळकाढूपणा करून राजकारण केले. त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त करत 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करणारी शिवसेना 100 टक्के राजकारण करत असल्याचेही आम.नितेश राणे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here